मारुती सुझुकीची डिझेल 'सेलेरियो' बाजारात दाखल

मारुती सुझुकीची डिझेलवर चालणारी 'सेलेरियो' बुधवारी बाजारात दाखल झाली.  डिझेल गाडीला २७.६२ किलोमीटर प्रतिलीटर इतके मायलेज आहे. दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.  

Updated: Jun 4, 2015, 12:16 AM IST
मारुती सुझुकीची डिझेल 'सेलेरियो' बाजारात दाखल title=

नवी दिल्ली : मारुती सुझुकीची डिझेलवर चालणारी 'सेलेरियो' बुधवारी बाजारात दाखल झाली.  डिझेल गाडीला २७.६२ किलोमीटर प्रतिलीटर इतके मायलेज आहे. दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.  

'फिएट'च्या सोबत कंपनीने डिझेल इंजिन तयार केले आहे, ते छोटे आणि किफायतशीर आहे.पेट्रोलवर चालणारी सेलेरिया याआधीच बाजारात उपलब्ध आहे.

एकूण चार प्रकारात ही गाडी ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. ज्याची दिल्लीतील एक्सशोरूम किंमत ४.६५ लाखापासून ५.७१ लाख इतकी आहे. 
नव्या सेलेरियोच्या इंजिनाचे वजन ८९ किलो असून, देशातील सर्वांत हलके कार इंजिन आहे.

सेलेरियोच्या मागील काचेला वायपर, डीफॉगर, ऑडिओ विथ ब्लूटूथ आणि सेंट्रल लॉक, चालक आणि चालकाशेजारच्या व्यक्तीसाठी एअरबॅग्ज तसेच अलॉय व्हिल्स, हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट देण्यात आले आहे.

सनशाईन ग्रे, ब्लेजिंग रेड, सेरुलियन ब्लू, पर्ल आर्कटिक व्हाईट, सिल्की सिल्व्हर, ग्लिस्टनिंग ग्रे या रंगांमध्येही गाडी उपलब्ध आहे.
डिजिटल क्लॉक, पुढे आणि मागे पॉवर विंडो

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.