शहिदाच्या मुलीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

दिल्ली यूनिवर्सिटीच्या रामजस कॉलेजमध्ये मागील काही दिवसांमधील विवादावर एक पोस्ट लिहिली आहे. कारगिल युद्धात शहीद कॅप्टन मंदीप सिंह यांच्या मुलगी गुरमेहर कौरने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात ही पोस्ट लिहिली आहे.

Updated: Feb 26, 2017, 11:19 AM IST
शहिदाच्या मुलीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल title=

नवी दिल्ली : दिल्ली यूनिवर्सिटीच्या रामजस कॉलेजमध्ये मागील काही दिवसांमधील विवादावर एक पोस्ट लिहिली आहे. कारगिल युद्धात शहीद कॅप्टन मंदीप सिंह यांच्या मुलगी गुरमेहर कौरने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात ही पोस्ट लिहिली आहे.

गुरमेहरने १४० शब्दांच्या फेसबुक पोस्टमध्ये विवादाचं वर्णन केलं आहे. गुरमेहर एबीवीपीच्या विरोधात 'टायरनी ऑफ फियर'च्या नावाने फेसबूक कँपेन देखील चालवत आहे. जी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बुधवारी रामजस कॉलेजमध्ये सेमिनारमध्ये जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी उमर खालिद यांना वक्ता म्हणून बोलवल्याने एबीवीपीच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला. विरोधाला हिंसक वळण लागल्यानंतर जवळपास २० विद्यार्थी जखमी झाले. उमर खालिद राजद्रोहाच्या प्रकरणात आरोपी आहे.

या घटनेच्या विरोधात लेडी श्रीराम कॉलेजची विद्यार्थी गुरमेहरने तिची फेसबूक प्रोफाईल फोटो बदलला. या फोटोमध्ये लिहिलं आहे की, 'मी दिल्ली यूनिवर्सिटीची विद्यार्थी आहे. मी एबीवीपीला नाही घाबरली आहे. मी एकटी नाही आहे. देशातील प्रत्येक विद्यार्थी माझा सोबत आहे.'

गुरमेहर ही जेव्हा २ वर्षाची होती तेव्हाच तिचे पिता कॅप्टन मंदीप सिंह कारगिल युद्धात शहीद झाले. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामध्ये ही गुरमेहरने एक व्हिडिओच्या माध्यमातून इर्षा सोडून पाकिस्तानसोबत प्रेमाचा संदेश दिला होता. सोशल मीडियावर त्याचीही चर्चा होती.