प्राणीसंग्रहालयात वाघाच्या हल्ल्यात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

दिल्लीतील एका प्राणीसंग्रहालयात आज एक दु:खद घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात एका २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेचं भयानक दृश्य समोर आलंय.

Updated: Sep 23, 2014, 09:10 PM IST
प्राणीसंग्रहालयात वाघाच्या हल्ल्यात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू title=

नवी दिल्ली: दिल्लीतील एका प्राणीसंग्रहालयात आज एक दु:खद घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात एका २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेचं भयानक दृश्य समोर आलंय.

आज दुपारी दीडच्या सुमारास १२वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर पांढऱ्या वाघानं हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यानं मुलगा हादरला आणि त्याला स्वत:ला वाचवायला वेळ मिळाला नाही. 

प्रत्यक्षदर्शींनुसार वाघाच्या कुंपणाची उंची कमी होती. फिरायला आलेला विद्यार्थी वाघाला जवळून बघण्यासाठी म्हणून त्याच्या जवळ गेला. वाकून जवळून पाहण्याच्या नादात मुलाचा पाय घसरला आणि तो सरळ वाघाच्या कुंपणात पडला. वाघानं एकही क्षण न गमावता त्याच्यावर हल्ला केला आणि काहीच मिनिटात मुलाचा मृत्यू झाला. 

जेव्हा वनविभागाचे लोक तिथं पोहोचले, तोपर्यंत मुलाचा जीव गेलेला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.