<b> मंगळयान : भारताची मंगळाला `भाऊबीज भेट`! </B>

आज दुपारी दोन वाजून ३८ मिनिटांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचं मंगळयान आकाशात झेपावणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 5, 2013, 04:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, श्रीहरिकोटा
आज दुपारी दोन वाजून ३८ मिनिटांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचं मंगळयान आकाशात झेपावलं आणि भारताच्या इतिहासाचं सोनेरी पान जोडलं गेलं.
इस्रोनं विकसित केलेल्या आणि सर्वाधिक विश्वासार्ह अशा पीएसएलव्ही रॉकेटच्या मदतीनं `मंगळयानानं मंगळाच्या दिशेनं उड्डाण भरलं. साधारणतः ३०० दिवसांनी, ३० सप्टेंबर २०१४ रोजी हे यान मंगळाच्या कक्षेत पोहोचेल. यानावर मंगळाच्या वातावरणाचा आणि मातीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याची छायाचित्रं घेण्यासाठी ५ विविध उपकरणं मंगळयानावर बसवण्यात आली आहेत, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी दिलीय.

सुमारे ३०० शास्त्रज्ञ गेल्या अनेक महिन्यांपासून या मोहीमेवर काम करत आहेत. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर मंगळावर स्वारी करणाऱ्या अमेरिका, रशिया आणि युरोपियन देशांच्या रांगेत भारत जाऊन बसणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.