नवी दिल्ली : मराठा क्रांती मूक मोर्चाचं दिल्लीतही आयोजन करण्यात आलंय. येत्या 20 नोव्हेंबरला दिल्लीत मोर्चा काढण्यात येणार आहे.
जंतरमंतरवरून मराठा मोर्चाला सुरुवात होईल. त्यासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.
दिल्लीत नोकरी धंद्यांच्या निमित्तानं आलेले मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्यानं मोर्चात सहभागी होणार आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना हा मोर्चा होणार असल्यानं त्याला महत्व प्राप्त होईल असं आयोजकांचं मत आहे.