मोदींच्या ‘वजीरा’नं गांधींना केलं चेकमेट!

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सध्या काँग्रेसजनांची झोप उडवलीय. पर्रिकरांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मतदारसंघातलं एक खेडं दत्तक घेणार आहेत. 

Updated: Dec 19, 2014, 10:10 AM IST
मोदींच्या ‘वजीरा’नं गांधींना केलं चेकमेट! title=

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सध्या काँग्रेसजनांची झोप उडवलीय. पर्रिकरांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मतदारसंघातलं एक खेडं दत्तक घेणार आहेत. 

अमेठी हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला, राहुल गांधी अमेठीचे खासदार… तर पर्रिकर उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर गेलेत. त्यामुळे पर्रिकरांच्या या विचाराने काँग्रेस नेते चांगलेच चिंतेत आहेत. याबाबतची घोषणा पर्रिकर केव्हाही करतील अशी शक्यता आहे. 

अमेठीमधून गांधी घराण्यातले सदस्य वर्षानुवर्ष निवडून येत आहेत. देशाचं नेतृत्व करणारं घराणं इथून निवडून येऊनही अमेठी मागासच आहे. त्यामुळे नेहमीच टीका होते. त्यातच आता पर्रिकरांनी मतदारसंघातलं एक खेडं दत्तक घेऊन सरळसरळ गांधी घराण्यालाच चेक दिलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.