www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान मनमोहन सिंग नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केलं होतं. यावर पंतप्रधान कार्यालयानं तातडीनं स्पष्टीकरण देत या वृत्ताला उडवून लावलंय.
‘पंतप्रधान आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत... याबद्दलची घोषणा येत्या ३ जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे’ असं वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्रानं दिलं होतं. आगामी लोकसभा निवडणूका ध्यानात घेताल राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून दर्शविण्यासाठी पंतप्रधान हे पाऊल उचलतं असल्याचं म्हटलं जात होतं. तसंच काँग्रेसच्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत झालेला पराभवही पंतप्रधानांच्या जिव्हारी लागला गेल्याचं या बातमीत म्हटलं गेलं होतं.
यावर पंतप्रधान कार्यालयानं तात्काळ ही बातमी फेटाळून लावत, ३ जानेवारी रोजी होणारी पत्रकार परिषध ही केवळ आगामी निवडणुकांच्या धर्तीवर असेल, असं स्पष्ट केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.