शाहरूख खानला अडीच कोटीचा फ्लॅट गिफ्ट मिळणार

कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बॉलीवूडचा किंग खान शाहरुखला २.५ कोटी किमतीचा आलिशान फ्लॅट भेट म्हणून देणार आहेत. प.बंगालचा राजदूत झाल्याने तेथील राज्य सरकारने शाहरुखला ही भेट दिली आहे. 

Updated: Dec 24, 2015, 07:28 PM IST
शाहरूख खानला अडीच कोटीचा फ्लॅट गिफ्ट मिळणार  title=

कोलकाता : कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बॉलीवूडचा किंग खान शाहरुखला २.५ कोटी किमतीचा आलिशान फ्लॅट भेट म्हणून देणार आहेत. प.बंगालचा राजदूत झाल्याने तेथील राज्य सरकारने शाहरुखला ही भेट दिली आहे. 

या प्रकल्पात विविध हाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  कोलकातापासून जवळच असलेल्या राजारहाट परिसरात एक शानदार गृहप्रकल्प उभारला जात आहे. 

सृष्टी ग्रूप या गृहप्रकल्पाचे काम करत असून, फाइव्ह स्टार हॉटेल, सुसज्ज घरं, कॉर्पोरेट कार्यालये, जागतिक दर्जाचे हेल्थ सेंटर, हेलिपॅड अशा अनेक सुविधा या प्रकल्पात असणार आहेत. शाहरुखला देणाऱया या भेटीबद्दल राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

पश्चिम बंगालचा राजदूत म्हणून सरकारच्या जाहिरातीच्या बदल्यात कोणतेही मानधन न घेण्याचे शाहरुखने सांगितले होते. त्यामुळे शाहरुखच्या या योगदानाच्या मोबदल्यात कृतज्ञता व्यक्त करत प.बंगाल सरकार शाहरुखला फ्लॅट भेट देण्याचा निर्णय घेतला.