नवी दिल्ली : दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील कॅंटीग वाद चांगलाच फेटला. शिवसेनेने आंदोलन करीत चांगलाच दणका दिला. त्यानंतर व्यवस्थापन ताळ्यावर आले. पुन्हा कॅंटीन सुरु करण्याचे आश्वास देण्यात आलेय.
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या दूरवस्थेप्रकरणी झालेल्या बैठकीला येण्याचं पुन्हा एकदा निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी टाळलं. त्यामुळे शिवसेना खासदारांना सहाय्यक निवासी आयुक्त संध्या पवार आणि व्यवस्थापक नितीन गायकवाड यांचीच भेट घ्यावी लागली. दरम्यान, दिल्लीत सेनेने आपला हिसका दाखवताना इशारा दिला.
दरम्यान, निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी यावेळी भेट टाळली तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा सेना खासदारांनी दिला होता. आता महाराष्ट्र सदनाच्या पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. दरम्यान उद्या कँटीन सुरू करण्याचं आश्वासन व्यवस्थापनाने दिलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.