www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ५२ उमेदवारांची नावे आहेत. परंतु यामध्ये नरेंद्र मोदींचे नाव नाही. मात्र, कर्नाटकातील बीएस येडियुरप्पा यांना शिमोगा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचा कर्नाटक जनशक्ति पक्ष भाजपमध्ये विलिन करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्या यादीत येडियुरप्पा यांना स्थान देण्यात आले आहे. ही यादी अनंत कुमार यांनी जाहीर केली. कर्नाटकात २८ जागांपैकी २० उमेदवार आज ठरविण्यात आले.
राज्यसभेचे खासदार चंदन मित्रा यांना हुगळीतून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अनंत कुमरा हे बंगळुरुतील दक्षिण मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत. गायक बाबुल सुप्रियो आसनसोल येथून उमेदवारी देण्यात आली आहे. सदानंद गौड़ा बंगळुरुतील उत्तर मतदार संघातून निवडणूक लढवतील.
ओडिशा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर पश्चिम बंगालमधून ९, आसाममधून ३, त्रिपुरातून २, केरळमधून ३, दोन, केरळ तीन उमेदवार जाहीर केले.
सुषमा स्वराज भोपाळमधून तर नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तिसरी यादी १३ मार्च रोजी जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.