झज्जर : हरियाणातील झज्जर येथील एका बस डेपोत असलेल्या सार्वजनिक शौचालयात देहविक्रीचा धंदा करणाऱ्या तरुण-तरुणींना तेथील नागरिकांनी बेदम चोप दिला. बस स्थानकातील सार्वजनिक शौचालयातील कर्मचाऱ्याच्या कार्यालयात हा धंदा सुरू होता.
स्थानिकांनी संशयावरून एका जोडप्याला विचित्र अवस्थेत पकडून बेदम मार दिल्यावर त्याची पोलिसांना कल्पना दिली गेली. पण, त्यानंतर पोलीस पोहोचेपर्यंत या जोडप्याने तेथून पळ काढला.
दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात तेथील नियुक्त कर्मचारीच आपली खोली भाड्याने देत असल्याची माहिती पुढे आली आहे. यातील एक कर्मचारी फरार झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून तिथे हा प्रकार सुरू असल्याचे निरीक्षण स्थानिकांनी केले होते. काही तरुण-तरुणी इथे येऊन कर्मचाऱ्यांना काही पैसे देऊन खोलीत जात असल्याचे निरीक्षण केले होते.
तेव्हा एक दिवस तेथील लोकांनी या शौचालयाला वेढा दिला आणि या तरुणांना आत पकडले. पोलीस येईपर्यंत त्यांनी आणि एका कर्मचाऱ्याने पळ काढला. दुसऱ्या कर्मचाऱ्याला पकडून आता पोलीस अधिक तपास करत आहेत.