www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय. तसे पत्र अध्यक्ष राजनाथ सिंग यांना दिले. हे पत्र प्रसिद्धी माध्यमांच्या हाती आलेय.
अडवाणी यांनी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांना पत्र लिहिलेय. या पत्रात त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेय. भाजप पक्ष ज्या विचाराने काढला होता. त्या विचाराने तो चालत नाही. जे काही निर्णय घेतले जात आहेत, त्याबाबत काहीही विचारण केली जात नाही. त्यामुळे आपण मी आपल्या पदांचा राजीनामा दित आहे, असे अडवाणी यांनी नमूद केलेय.
गोव्यात भाजपची तीन दिवशी बैठक पार पडली. या बैठकीच्या शेवटच्या दिवशी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची २०१४च्या लोकसभा निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तशी घोषणा भाजप अध्यक्ष राजनाथसिंग यांनी केली होती. पक्षात मोदींना जास्तच महत्व देण्यात येत असल्याने अडवाणी नाराज होते. या नाराजीतून अडवाणी यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.