`काँग्रेस मुक्त भारत निर्माण` हाच संकल्प- मोदी

आज गोव्यामध्ये जनतेसमोर केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल करत `काँग्रेस हटाव`चा नारा दिला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 9, 2013, 06:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पणजी
भारतीय जनता पक्षाने २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार प्रमुखपदी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. आज गोव्यामध्ये जनतेसमोर केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल करत `काँग्रेस हटाव`चा नारा दिला. प्रथम आपल्या भाषणाची मराठी भाषेतून सुरूवात करत मोदींनी उपस्थितांची मनं जिकंली. त्यानंतर काँग्रेसवर टीका करत दशातील अनेक समस्यांवर बोट ठेवलं.
काय म्हणाले मोदी आपल्या भाषणात?
पक्षाच्या नेत्यांनी माझा विकास केला- मोदी|
भाजपकडे कार्यकर्त्यांचं मोठं वैभव- मोदी|
सत्ता आमच्यासाठी भोगण्याची गोष्ट नाही- मोदी|
केवळ भाजप स्वच्छ सरकार देऊ शकतं- मोदी|
देशातील जनता असुरक्षित| देशाला बदलाची गरज- मोदी|
मोदींनी आपल्या भाषणात केला `गोवा मुक्ती संग्रामा`तील शहिदांचा गौरव|
`भारत निर्माण` जाहिरातीत `हक है मेरा` नीट ऐका `शक है मेरा` असं ऐकू येईल- मोदी
काँग्रेसचा लोकशाहीवर विश्वास नाही- मोदी|
कलम 356चा काँग्रेसने अनेकवेळा केला गैरवापर- मोदी|
काँग्रेस सातत्याने सीबीआयचा गैरवापर करते- मोदी|
मोदींनी सोनिया गांधींचं नाव न घेता केली टीका|
नक्षलवादाबाबत सरकार गंभीर नाही- मोदी|
`काँग्रेस मुक्त भारत निर्माण` हाच आपला संकल्प आहे- मोदी|