झारखंड, काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास सुरूवात

झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास रविवारी सकाळी सुरूवात झाली. जम्मू-काश्मीरमध्ये १८ जागांसाठी मतदान होत असून १८२ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होईल. १८९० मतदान केंद्रावर १४ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

Updated: Dec 14, 2014, 11:07 AM IST
झारखंड, काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास सुरूवात title=

रांची/ श्रीनगर: झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास रविवारी सकाळी सुरूवात झाली. जम्मू-काश्मीरमध्ये १८ जागांसाठी मतदान होत असून १८२ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होईल. १८९० मतदान केंद्रावर १४ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

तर झारखंडमध्ये अनेकांच्या भविष्याचा निर्णय आज मतदारांच्या हातात आहे. १५ जागांसाठी मतदान होत असून ५ हजार ४८२ मतदान केंद्रावर एकूण ४३ लाखांपेक्षा अधिक मतदार मतदान करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे. मतदनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.