नवी दिल्ली: अखेर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. शनिवार ७ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक पार पडणार असून १० फेब्रुवारी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या क्षणापासून आचारसंहिता लागू होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
एकूण ७० जागांसाठी पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी ११ हजार ७६३ मतदान केंद्रं असून १ कोटी ३० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
अधिसूचना १४ जानेवारीला निघणार, अर्ज भरण्याची मुदत २१ जानेवारीपर्यंत, अर्जाची छाननी आणि माघार २४ जानेवारीपर्यंत...
मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ०८, भाजपाला ३१, आम आदमी पार्टीला २८ तर इतर पक्षाला ०३ जागांवर विजय मिळविण्यात यश आलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.