नवी दिल्ली : नोटबंदीनंतर पुन्हा एकदा मोदी सरकारने अच्छे दिन दाखवलेत. ऑनलाईन खरेदीवर सवलतींची खैरात करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ऑनलाईन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.
18:10 PM
रेल्वेतील जेवणावर, विश्रामगृह, वेटिंग रुमवर ५ टक्के सवलत
18:07 PM
किसान क्रेडीट कार्डधारकांना रुपे कार्ड उपलब्ध करुन देणार
18:05 PM
नवीन विमा पॉलिसी काढणाऱ्यांना सुट देणार
18:02 PM
नवी दिल्ली : ग्रामीण भागात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वाइप मशीन आणि मायक्रो एटीएमची संख्या वाढवली जाईल - जेटली
17:53 PM
नवी दिल्ली : टोलनाक्यांवर ऑनलाइन टोल भरणाऱ्यांना 10 टक्के सवलत मिळेल - जेटली
17:52 PM
नवी दिल्ली : जनरल आणि जीवन विम्याचा ऑनलाइन भरणा केल्यास प्रिमियममध्ये मिळणार दहा टक्के सवलत - जेटली
17:51 PM
नवी दिल्ली : डिजिटल माध्यमातून पेट्रोल खरेदी करणाऱ्यांना 0.75 टक्के सवलत - जेटली
17:50 PM
नवी दिल्ली : 1 जानेवारी 2017 पासून मुंबई उपनगरीय रेल्वेपासून होणार सुरुवात, तसेच डिजिटल माध्यमातून तिकीट खरेदी करणाऱ्यांना मिळणार अपघात विमा - जेटली
17:49PM
नवी दिल्ली : नाबार्डच्या माध्यमातून ग्रामीण आणि सहकारी बॅंकांचे खातेदार असलेल्या आणि किसान कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना रूपी कार्ड देणार - जेटली
17:48 PM
नवी दिल्ली : 2000 रुपयांपर्यंतच्या ऑनलाईन व्यवहारांवर कोणताही सर्व्हिस चार्ज नाही
17:47 PM
नवी दिल्ली : रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेची तिकिटे आणि पास डिजिटल माध्यमातून खरेदी केल्यास मिळणार सवलत - जेटली
17:47 PM
नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे प्रमाण कमी करण्यात येईल - अरुण जेटली