दहशतवादाचा धोका : तिहार जेलची सुरक्षा वाढवली

 दिल्लीतील तिहार जेलवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणेनं दिलाय. काही महत्त्वाच्या कैद्यांना सोडवण्यासाठी असा होण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणेनं हायअलर्ट जारी केलाय. त्यानंतर तुरुंग परिसराची सुरक्षा वाढवण्यात आलीय.

Updated: Dec 19, 2014, 11:56 AM IST
दहशतवादाचा धोका : तिहार जेलची सुरक्षा वाढवली title=

नवी दिल्ली :  दिल्लीतील तिहार जेलवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणेनं दिलाय. काही महत्त्वाच्या कैद्यांना सोडवण्यासाठी असा होण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणेनं हायअलर्ट जारी केलाय. त्यानंतर तुरुंग परिसराची सुरक्षा वाढवण्यात आलीय.

पेशावरमधील शाळेवर झालेला दहशतवादी हल्ला आणि अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हायअलर्ट जारी करण्यात आलाय.

सीरिया आणि पाकिस्तानमध्ये भयंकर आणि क्रूर दहशतवादी हल्ला घडवून आणल्यानंतर भारतही दहशतवाद्यांच्या हीट लिस्टवर असल्याचं समजंतय. यामुळेच, देशभर हायअलर्ट जारी करण्यात आलेत.

काही दहशतवादी संघटना जेलमध्ये बंद असलेल्या आपल्या दहशतवादी साथीदारांना सोडवण्यासाठी तिहारवर हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणेनं दिलाय. त्यानंतर तीन स्तरीय सुरक्षा असलेल्या जेलची सुरक्षा वाढवण्यात आलीय. तिहार तुरुंगात सध्या अनेक दहशतवादी आणि अपराधी बंद आहेत. जेलच्या आजुबाजुला सुरू असलेल्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यात येतेय.  

दिल्ली पोलिसांना याअगोदरच गृहमंत्रालयाकडून हायअलर्ट मिळालाय. लष्कर - ए - तोयबा ही दहशतवादी संघटना हा हल्ला घडवून आणू शकते, अशी शंका व्यक्त केली जातेय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.