सर्जिकल स्ट्राईकमध्ये लष्कर-ए-तोयबाचं सर्वाधिक नुकसान

भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये लष्कर-ए-तोयबाचं सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आता समोर येत आहे.

Updated: Oct 9, 2016, 05:14 PM IST
सर्जिकल स्ट्राईकमध्ये लष्कर-ए-तोयबाचं सर्वाधिक नुकसान title=

नवी दिल्ली : भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये लष्कर-ए-तोयबाचं सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आता समोर येत आहे.

या हल्ल्यामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 20 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याच्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संभाषणाच्या टेप्सचं निदान भारतीय लष्करानं केलं आहे. पाकिस्तानी अधिकारी आणि लष्कराच्या संभाषणाच्या टेप्सचा रिपोर्ट भारतीय लष्करानं बनवला आहे.

भारतीय लष्कराकडून असा हल्ला होईल अशी अपेक्षा तिथल्या दहशतवाद्यांना नव्हती त्यामुळे बेसावध असलेल्या दहशतवाद्यांना प्रतिकार करता आला नसल्याचंही या संभाषणातून समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हा हल्ला झाल्यानंतर तिथला परिसर पुन्हा जैसे थे करण्याचा प्रयत्नही पाकिस्तानकडून करण्यात आला आणि यासाठी पाकिस्तानी लष्कराच्या वाहनांचा वापर करण्यात आला.