www.24taas.com, पटना
बिहारमधील मधुबनी आणि गया या जिल्ह्यात आंदोलनक करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराविरोधात राजद, लोजपा आणि इतर पक्षांनी बिहार बंदची हाक दिली. त्यासाठी राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि लोजपाचे अध्यक्ष रामविलास पासवान याच्यांसकट ६०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.
लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि स्वत:ला अटक करून घेतली. या आंदोलनाला अनेक पक्षांनी आपलं समर्थन दिलं. आणि त्यात सहभागी होऊन स्वत:ला अटक करवून घेतली.
पोलिसांच्या माहितीनुसार पटना शहरातील डाकबंगला येथे विविध पक्षाच्या ४५० हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. आणि कंकडबाग मधील स्पोर्टस कॉम्पलेक्स मधील तात्पुरत्या तुरूंगात पाठविण्यात आलं आहे. राज्यात सगळीकडे मिळून जवळजवळ ६०० लोकांना अटक करण्यात आली आहे.