देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह

देशभरात जन्माष्टमीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबई आणि दिल्लीच्या इस्कॉन मंदिरात भाविकांची मोठी गर्दी यानिमित्तानं पाहायला मिळतेय. 

Updated: Aug 18, 2014, 09:28 AM IST
देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह title=

मुंबई : देशभरात जन्माष्टमीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबई आणि दिल्लीच्या इस्कॉन मंदिरात भाविकांची मोठी गर्दी यानिमित्तानं पाहायला मिळतेय. 

मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी लांबचलांब रांगा लागल्या आहेत. 

हरे राम हरे कृष्णाच्या गजरानं मुंबई, मथुरा आणि दिल्लीचं इस्कॉन मंदिरं दुमदुमुन गेली आहेत. 

सकाळी मंगल आरतीनं मंदिरातील कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुमारे दहा लाख भाविक दर्शनासाठी येतील असा विश्वास या मंदिरातील पुजा-यांना आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.