मोदींच्या गुजरातमध्ये 'मोदी मॉडेल'ला मिळाली मात!

अहमदाबादहून जवळपास १०० किमी दूर असणाऱ्या पनसारी हे गाव सध्या कौतुकाचा विषय ठरलंय. हे गाव इथलं आदर्श गाव म्हणून ओळखलं जातंय. 

Updated: Nov 20, 2014, 11:21 PM IST
मोदींच्या गुजरातमध्ये 'मोदी मॉडेल'ला मिळाली मात! title=

पनसारी : अहमदाबादहून जवळपास १०० किमी दूर असणाऱ्या पनसारी हे गाव सध्या कौतुकाचा विषय ठरलंय. हे गाव इथलं आदर्श गाव म्हणून ओळखलं जातंय. 

कारण, या लहानशा गावात क्लोज सर्किट कॅमेरा, पाणी शुद्धीकरणाचे प्लान्ट, वातानुकुलित शाळा, वाय-फाय इंटरनेट इतकंच काय तर बायोमेट्रिक मशीनसारख्या सुविधाही उपलब्ध आहेत.  

या लहानशा गावाचा हा कायापालट केलाय या गावचे ३१ वर्षांचे सरपंच हिमांशू पटेल यांनी... केवळ आठ वर्षांत हा बदल गावात घडून आलाय. सरपंच पटेल यांनी उत्तर गुजरात युनिवर्सिटीमधून पदवी मिळवलीय. त्यांनी केवळ १६ करोड रुपयांत गावाचा चेहरा-मोहराच बदलून टाकलाय. हातात असलेल्या पैशांचं योग्य नियोजन करून पटेल यांनी हे साध्य केलंय. यासाठी राज्य सरकारकडून गेल्यावर्षी पनसारीला ५२ लाखांची मदतही उपलब्ध झाली. 

डिस्ट्रिक्ट प्लानिंग कमिशन, बॅकवर्ड रिजनल ग्रान्ट फंड, १२ वं फायनान्स कमिशनसोबत मिळून पटेल यांनी काम केलं. नुकतंच ग्रामीण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या टिमनंही पनसारीला भेट दिलीय. विकासासाठी पनसारी मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी ही टीम इथं दाखल झाली होती.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.