नरोडा पाटिया निकाल : कोडनानीला २८ वर्ष तुरूंगवास

२००२मध्ये गोध्रा हत्याकांडानंतर झालेल्या नरोडा पाटिया दंगलीतील दोषी ठरविण्यात आलेल्या ३२ जणांच्या शिक्षेवर एका विशेष न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. या प्रकरणात माजी मंत्री माया कोडनानीला २८ वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 31, 2012, 04:25 PM IST

www.24taas.com, अहमदाबाद
२००२मध्ये गोध्रा हत्याकांडानंतर झालेल्या नरोडा पाटिया दंगलीतील दोषी ठरविण्यात आलेल्या ३२ जणांच्या शिक्षेवर एका विशेष न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. या प्रकरणात माजी मंत्री माया कोडनानीला २८ वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
तर माजी विहिंप नेते बाबू बजरंगी यांच्यासह ३१ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे माया कोडनानी गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील माजी मंत्री आहे.
यापूर्वी गुजरातमधल्या नरोडा पाटिया हत्याकांड प्रकरणी भाजपच्या विद्यमान आमदार आणि माजी मंत्री माया कोडनानी यांच्यासह ३२ जणांना दोषी ठरवण्यात आलं होतं. दोषींमध्ये बजरंग दलाच्या बाबू बजरंगी याचाही समावेश होता.
गोध्रा हत्याकांडानंतर नरोडा पाटियामध्ये विश्व हिंदू परिषदेनं बंद पुकारला होता. त्यावेळी झालेल्या हत्याकांडात ९७ जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात ६२ आरोपी होते. त्यापैकी तिघांचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला. तर इतरांची जामिनावर सुटका झाली. आत्तापर्य़ंत या खटल्यात ३२७ जणांची साक्ष घेण्यात आली.
माया कोडनानी यांना दोषी ठरवल्यामुळं हा नरेंद्र मोदी सरकारला मोठा धक्का मानला जातोय. अहमदाबादच्या विशेष कोर्टानं हा निर्णय दिलाय.