नवी दिल्ली : सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी या अपघातातून थोडक्यात बचावल्या. याचं कारण आता समोर आलं आहे. त्यांच्या मर्सिडीजमध्ये लावण्यात आलेल्या एअर बॅगमुळे त्यांना गंभीर दुखापत झाली नसल्याचं समोर आलं आहे.
राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील त्यांच्या कारला अपघात झाला. त्यात हेमा मालिनी या किरकोळ जखमी झाल्यात. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हेमा मालिनी जयपूरला जात होत्या. त्यावेळी हा अपघात घडला. या अपघातात अल्टोतील एका चिमुरडीचा मृत्यू झाला.
हेमा मालिनी यांच्या गाडीत एअर बॅग होत्या. महागड्या गाड्यांमध्ये या एअर बॅग असतात. अपघात झाल्यास या एअर बॅग उघडतात. सीटवर बसलेल्या व्यक्ती या एअर बॅगमुळे वाचतात.
हेमा मालिनी अशाच एअर बॅगमुळे वाचल्या. अपघातापासून बचावासाठी एअर बॅगची खूप महत्त्वाची भूमिका असते. ज्या कारमध्ये एअर बॅग लावण्यात येतात त्यात एक डायग्नोस्टिक सिस्टिम लावण्यात येत. या सिस्टिमच्या आधारे आपल्या समजते की एअर बॅग ठिक काम करताहेत की नाही. कार स्टार्ट केल्यावर हे इंडिकेटर काही सेकंदानंतर ऑफ नाही झाले आणि कायम ऑन झाले. तर एअर बॅगमध्ये प्रॉब्लेम असल्याचे समजते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.