कीर्ती आझाद भाजपमधून निलंबित, शत्रुघ्न सिन्हांकडून पाठराखण

 भाजप खासदार कीर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन म्हणजेच डीडीसीए मधल्या तिकीट वाटप घोटाळ्यावरुन, कीर्ती आझाद यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरच आरोप केले होते. त्यानंतर आझाद यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Updated: Dec 23, 2015, 06:40 PM IST
कीर्ती आझाद भाजपमधून निलंबित,  शत्रुघ्न सिन्हांकडून पाठराखण title=

नवी दिल्ली :  भाजप खासदार कीर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन म्हणजेच डीडीसीए मधल्या तिकीट वाटप घोटाळ्यावरुन, कीर्ती आझाद यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरच आरोप केले होते. त्यानंतर आझाद यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि भाजप खासदार किर्ती आझाद यांच्यात सुरू असलेल्या वादात आता खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी उडी घेतली आहे. सिन्हा यांनी बुधवारी ट्विटरच्या माध्यमातून अरूण जेटलींना अंगावर घेणाऱ्या आझाद यांना ‘हिरो’ची उपमा दिली आहे.

जेटलींविरोधात आवाज उठवणाऱ्या आझाद यांच्याविरोधात भाजपने कोणतीही कारवाई करू नये, अशी विनंतीही शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षाला केली होती. मात्र, पक्षाने कीर्ती आझाद यांना निलंबित केलेय. हा शत्रुघ्न सिन्हा यांना एक प्रकारे इशारा देण्याचा प्रयत्न केलाय.

दुर्देवाने सध्या ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख असलेला पक्ष ‘पार्टी विथ डिफरन्सेस’ झाला आहे. अर्थमंत्र्यांबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी हा मुद्दा कायदेशीर नव्हे तर राजकीय पद्धतीने लढवावा. आपल्या धडाडीच्या पंतप्रधानांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी अडवाणींचा मार्ग अनुसरावा जेणेकरून ते या सगळ्यातून सहीसलामत बाहेर पडतील, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटलेय.