किरण बेदींनी नरेंद्र मोदींची तळी उचलली, माझे मत नमोंना

भ्रष्टाचार विरोधी लढ्यातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या साथीदार आणि माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांनी चक्क नरेंद्र मोदींच्या पारड्यात आपलं वजन टाकलंय. पंतप्रधानपदासाठी माझं मत मी नमोंना म्हणजे नरेंद्र मोदींना देईन, असं ट्विट किरण बेदींनी केलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 10, 2014, 04:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भ्रष्टाचार विरोधी लढ्यातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या साथीदार आणि माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांनी चक्क नरेंद्र मोदींच्या पारड्यात आपलं वजन टाकलंय. पंतप्रधानपदासाठी माझं मत मी नमोंना म्हणजे नरेंद्र मोदींना देईन, असं ट्विट किरण बेदींनी केलंय.
बेदी यांनी भाजपच्या नरेंद्र मोदींची केलेली पाठराखण हा अरविंद केजरीवालांच्या `आम आदमी पार्टी`साठी दणका असल्याचं मानलं जातंय. दरम्यान, बेदींनी मोदींची तळी उचलून धरल्याने आपण व्यथित झालेलो नाही, असं दिल्लीचे मुख्यमंत्री आणि `आप`चे नेते अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय. तर या प्रकरणाबद्दल माहिती घेऊन बोलेन, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी व्यक्त केलीय.

नेमकं काय केलंय ट्विट
माझ्यासाठी भारत देश सर्वांत महत्त्वाचा आहे. एक स्वतंत्र मतदार म्हणून माझे मत मी मोदी यांना देईन. (मोदी हे) एक स्थिर, उत्तम प्रशासन असलेले, जबाबदार व सर्वसमावेशक सरकार देऊ शकतात. आपला पाठिंबा भाजपला नसल्याचे बेदी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. मात्र, सरकार चालविण्याचा प्रश्‍न उपस्थित झाल्यास अनुभवी मोदी हेच एक स्थिर सरकार देऊ शकतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.