राजधानीत हॉरर किलिंग : आपल्या पोटच्या गोळ्याला जाळून मारलं

भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत एक भयंकर हॉरर किलिंगचं प्रकरण समोर आलंय. ही घटना दिल्लीच्या द्वारका भागात घडलीय. 

Updated: Nov 19, 2014, 06:21 PM IST
राजधानीत हॉरर किलिंग : आपल्या पोटच्या गोळ्याला जाळून मारलं title=

नवी दिल्ली : भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत एक भयंकर हॉरर किलिंगचं प्रकरण समोर आलंय. ही घटना दिल्लीच्या द्वारका भागात घडलीय. 

मुलीनं आपला विरोध डावलून प्रियकराशी लग्न केल्यानं संतापलेल्या आई-बापानंच लग्नानंतर ७२ तासांतच मुलीला जाळून ठार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना अटकही केलीय. 

मुलीनं १२ नोव्हेंबर रोजी अभिषेक सेठ नावाच्या एका पंजाबी तरुणासोबत विवाह केला होता. मात्र, तिचे आई-वडील या लग्नानं खूश नव्हते. कारण होतं, मुलगा त्यांच्या जातीचा नव्हता... त्यामुळेच, मुलीच्या आई-वडिलांनी या विवाहाला मान्यता दिली नाही. 

सुरुवातीपासूनच ते आपल्या लग्नाच्या विरोधात होते, असं म्हणत मृत मुलीच्या पतीनं – अभिषेकनं आपल्या सासू – सासऱ्यांवर मुलीच्या खुनाचा आरोप केलाय. ‘लग्नानंतर दोन दिवसांतच मुलीला तिच्या आईवडिलांनी आपल्या घरी बोलावून घेतलं... माझ्याकडे तिच्या चुलत भावाचा फोन आला की तिच्या आई-वडिलांनीच तिला जाळून ठार केलंय, असं अभिषेकनं म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.