नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस घट होत चालल्यानं भारतात ऑक्टोबर २०१४ मध्ये जवळपास ३०० टक्क्यांनी सोन्याची आयात वाढलीय... हेच कारण ठरलंय केंद्र सरकारच्या चिंतेचं... त्यामुळे, आता यावर उपाय काढायलाच हवा, या दृष्टीने येत्या दोन दिवसांत पावलं उचलण्यात येणार असल्याचं समजतंय.
अर्थ मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, सोन्याची आयात धोकादायक पद्धतीनं वाढतेय. गेल्या ऑक्टोबर महिन्यात ४.१७ अरब डॉलर किंमतीचं सोनं आयात करण्यात आलं होतं. तर एक वर्षांपूर्वी म्हणजे ऑक्टोबर २०१३ मध्ये केवळ १.०९ अरब डॉलर किंमतीचं सोनं आयात करण्यात आलं होतं. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी सध्या मंत्रालयाचे अधिकारी रिझर्व्ह बँकेशी चर्चा करत आहेत...
उल्लेखनीय म्हणजे, रिझर्व्ह बँकेनं सोनं आयातीवर ८० आणि २० चा फॉर्म्युला लावला होता. म्हणजेच, जर १०० किलो सोनं आयात केलं गेलं तर त्यातील कमीत कमी २० किलो सोन्याची आभूषणं बनवून ती निर्यात करणं बंधनकारक आहे. यामुळे आयात कमी झाली होती परंतु, व्यापारी मात्र नाराज झाले होते. याच दरम्यान सोन्याच्या तस्करीचं प्रमाणही वाढल्याचं निदर्शनास आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.