हैदराबाद : दिल्ली सरकारने रोहित वेमुला याच्या भावापुढे नोकरीचा प्रस्ताव ठेवला आहे. केजरीवाल यांनी रोहितच्या आईची दिल्लीत २४ फेब्रुवारी रोजी भेट घेतली होती. यावेळी रोहितच्या भावाला नोकरी देणार असल्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले होते. रोहितचा भाऊ राजा याने पदवीचे शिक्षण घेतले आहे.
हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येनंतर त्याच्या भावाला सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
राजाला नोकरी मिळाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांची आर्थिक प्रश्न काही स्वरूपात सुटू शकेल आणि त्याला अभ्यास करून पुढेही जाता येईल असा यामागचा उद्देश आहे, अशी माहिती दिल्ली सरकारने दिली.
दिल्ली सरकारकडे सी आणि डी श्रेणीतील लेखनिकाच्या काही जागा भरायच्या आहेत. यामुळे केजरीवाल सरकारने राजाला लेखनिकाच्या नोकरीचा प्रस्ताव ठेवला आहे.