चंडीगड : हरियाणातील मनोहर लाल खट्टर सरकारने गुडगाव जिल्ह्याचे नाव बदलून गुरूग्राम केले आहे. या नामकरणासाठी त्यांनी महाभारताचा संदर्भ दिली आहे.
खट्टर सरकारने मंगळवारी नामकरणाचा निर्णय घेतला. या भागातील अनेकांनी जिल्ह्याचे नाव गुडगाव बदलून गुरूग्राम ठेवण्याची मागणी करत होते.
गुडगावसह मेवात जिल्ह्याचेही नाव बदल्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. आता मेवातला नूंह म्हणून ओळखले जाणार आहे.
या निर्णयाचा परिणाम गुडगाव शहराच्या नावावरही होणार आहे.