काश्मिरी मुलींचा बॅण्ड बंद करण्याचा फतवा

काश्मिरमध्ये मुलींनी हटके रॉकिंग बॅण्डची स्थापना केली. मात्र, ही संकल्पना अनेकांच्या डोळ्यात खूपलेय. हा बॅण्ड बंद करण्याचा फतवा मुस्लिम संघटनांनी काढलाय. बॅण्डमधून भीतीपोटी तीन मुली बाहेर पडल्यात.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 4, 2013, 04:05 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
काश्मिरमध्ये मुलींनी हटके रॉकिंग बॅण्डची स्थापना केली. मात्र, ही संकल्पना अनेकांच्या डोळ्यात खूपलेय. हा बॅण्ड बंद करण्याचा फतवा मुस्लिम संघटनांनी काढलाय. बॅण्डमधून भीतीपोटी तीन मुली बाहेर पडल्यात.
काश्मिरमध्ये दहावीतल्या मुलींनी एकत्र येऊन रॉकिंग बॅण्डची स्थापना केली. हा बॅण्ड अल्पावधीतच लोकप्रियही ठरू लागलाय. मात्र, काही मुस्लिम संघटनांची जणू या बॅण्डला नजर लागलीये. हा बॅण्ड बंद करा, असा फतवा या मुस्लिम संघटनांनी काढलाय.

एवढंच नाही तर सोशल वेबसाईटवर या मुलींना धमकीही देण्यात आलीये. त्यामुळे वर्षभरातच बॅटल ऑफ द बॅण्ड्स या किताबाचा मानकरी ठरलेला हा बॅण्ड बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या रॉकिंग बॅण्डमधल्या मुली मात्र हिरमुलल्यायेत.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी मात्र या मुलींच्या पाठिशी आपण ठामपणे उभे राहणार असल्याचं ट्विट केलंय. दरम्यान, मुस्लीम संघटनांच्या फतव्यानंतर या रॉकिंग बॅण्डमधून तीन मुली बाहेर पडल्यात.