नदी पूलावर दोन रेल्वे घसरल्या; २८ जणांचे मृतदेह सापडले

मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमानजिक मध्य प्रदेशातल्या हरदा इथे दोन एक्स्प्रेस गाड्या रुळावरुन घसरल्या. या दुर्घटनेत आतापर्यंत २८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर सुमारे तीनशे जणांना वाचवण्यात आलं आहे. 

Updated: Aug 5, 2015, 11:20 PM IST
नदी पूलावर दोन रेल्वे घसरल्या; २८ जणांचे मृतदेह सापडले  title=

सकाळी ८.३० वाजता

- रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २८ वर

सकाळी ८.०० पर्यंत

- कामायनी एक्सप्रेसचे तीन डबे पाण्यातून बाहेर काढले 

- अपघातानंतर रेल्वे मार्गाचं मोठं नुकसान 

- इटारसी सेक्शनच्या ३५ गाड्यांचे मार्ग बदलले, ४ गाड्या रद्द

- अपघातस्थळी मदत कार्यासाठी वेगळी रेल्वे गाडी

- मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची भीती - किरण रिजीजू

 

हरदा : मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमानजिक मध्य प्रदेशातल्या हरदा इथे दोन एक्स्प्रेस गाड्या रुळावरुन घसरल्या. या दुर्घटनेत आतापर्यंत २० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर सुमारे तीनशे जणांना वाचवण्यात आलं आहे. 

भोपाळ - खांडवा रेल्वेपट्ट्यातल्या माचक नदी पूलावर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमाराला यातली पहिली दुर्घटना घडली. मुंबईहून वाराणसीला जात असलेल्या कामायनी एक्स्प्रेसचे ११ डबे रात्री माचक नदी पूलावरुन घसरले. यावेळी जोरदार पाऊस पडत होता. तर नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे ही दुर्घटना घडली.

त्यानंतर काही वेळानं सुमारे पाऊणे बाराच्या सुमाराला पटणाहून राजेंद्रनगर मुंबई जनता एक्स्प्रेस याच मार्गावरुन येत होती. त्या गाडीचेही चार डबे आणि इंजिन याच माचक नदी पूलावरुन घसरले. जोराचा पाऊस, रात्रीची वेळ आणि नदीनं ओलांडलेली धोक्याची पातळी यामुळे, ही दुर्घटना घडली.

या दुर्घटनेनंतर रातोरात रेल्वे प्रशासन स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं युद्धपातळीवर बचावकार्याला लागलं. स्वतः रेल्वेमंत्री सुरेश प्रभू बचावकार्यावर लक्ष ठेऊन होते. इटारसी, भुसावळ, तसंच इतर ठिकाणांहून रेल्वे गाड्या मदतकार्यासाठी रात्रीच घटनास्थळी रवाना केल्या गेल्या. 

मात्र, पाऊस आणि नदीची वाढलेली पाणी पातळी यामुळे मदतकार्यात अडथळे येते होते. या अपघातात मोठी जीवित हानी होण्याची शक्यताही केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी वर्तलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.