राष्ट्रगीतातील 'अधिनायक' शब्द काढा: कल्याण सिंह

राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांनी  राष्ट्रगीतातील 'अधिनायक' काढून टाकण्याची मागणी केली आहे, अधिनायक ऐवजी मंगल शब्द वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

Updated: Jul 7, 2015, 08:53 PM IST
राष्ट्रगीतातील 'अधिनायक' शब्द काढा: कल्याण सिंह title=

जयपूर : राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांनी  राष्ट्रगीतातील 'अधिनायक' काढून टाकण्याची मागणी केली आहे, अधिनायक ऐवजी मंगल शब्द वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

अधिनायक हा शब्द ब्रिटिश राजवटीच्या स्तुतीसाठी वापरण्यात आला होता, असं कल्याण सिंह यांनी म्हटलं आहे. राजस्थान विद्यापीठाच्या 26व्या पदवीप्रदान सोहळ्यात कल्याणसिंह बोलत होते.
  
कल्याण सिंह यांनी यावर सवाल करतांना म्हटलं आहे. 'जन-गन-मन अधिनायक जय हे...' यातील 'अधिनायक' हे कोणाला उद्देशून आहे? ही ब्रिटिशांसाठीची स्तुतिसुमने आहेत, तरी यामध्ये दुरुस्ती करावी आणि 'जन-गन-मन मंगल जय हे,' असे राष्ट्रगीत म्हटलं जावं.

याविषयी आणखी बोलतांना कल्याण सिंह म्हणाले, रवींद्रनाथ टागोरांबद्दल आपल्याला मनापासून आदर आहे, परंतु त्यांनी लिहिलेल्या राष्ट्रगीतातील हा शब्द बदलून 'मंगल' असा करावा, असे माझे ठाम मत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. 

तसेच 'महामहिम' हा शब्दही वगळून 'माननीय' शब्दाचा वापर करावा असे त्यांनी सुचविले. राज्यपाल हा काही 'महान' नसतो, तरी त्यांना ब्रिटिश काळात देण्यात आलेली 'महामहिम' ही पदवी आता बंद करावी, असंही कल्याण सिंह यांनी सूचवलं आहे.

व्हिक्‍टोरिया राणी ग्रेट नव्हती, युद्ध लढणारी झाशीची राणी ग्रेट होती, तसेच औरंगजेब महान नव्हता तर शिवाजी महाराज हे महान होते, असंही कल्याणसिंह यांनी यावेळी म्हटलंय

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.