कोल्हापूर : ज्येष्ठ कन्नड लेखक प्रा. एमएम कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणातल्या संशयिताची हत्या झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
रेखाचित्र आणि मृत व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये साम्य आढळून आलंय. बेळगाव जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यात माणिकवाडी इथे हत्या झालीय. मृत व्यक्ती या कलबुर्गी हत्या प्रकरणातला संशयित आहे का याचा तपास सुरू आहे.
कलबुर्गी यांच्या हत्येनंतर कर्नाटक पोलिसांनी जारी केलेल्या संशयिताच्या रेखाचित्राशी मिळता जुळता चेहरा असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह बेळगावतील खानापूरच्या जंगलात आढळला. अज्ञात व्यक्तीने गोळ्या घालून या व्यक्तीचा हत्या केल्याचे सकृतदर्शनी पोलिसांना आढळले आहे.
कलबुर्गी यांची ऑगस्टमध्ये धारवाड येथील त्यांच्या राहत्या घरी दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर कर्नाटक सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे देण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्नाटक पोलिसांचे विशेष पथक बंगळुरूहून बेळगावमध्ये दाखल झाले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.