दगडफेकीला उत्तर दगडफेकीनेच... जनसेनेचा इशारा

काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी अशा तरुणांवरच दगडफेक करण्याचा विडा एका संघटनेनं उचललाय.  

Updated: May 6, 2017, 04:42 PM IST
दगडफेकीला उत्तर दगडफेकीनेच... जनसेनेचा इशारा title=

कानपूर : काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी अशा तरुणांवरच दगडफेक करण्याचा विडा एका संघटनेनं उचललाय.  

'जनसेना' संघटनाचे प्रमुख चेतन महापुरी यांनी काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपण जवळपास १००० सहकाऱ्यांसोबत खोऱ्यात जाणार असल्याचं म्हटलंय. हे सगळे कार्यकर्ते आपल्यासोबत एक ट्रकभरून दगडही आपल्यासोबत घेऊन जाणार आहेत. या दगडफेकीसाठी कार्येकर्त्यांना खास ट्रेनिंग देण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय.  

देशाच्या अखंडतेला धक्का लावणाऱ्यांवर काश्मीर खोऱ्यात जाऊन दगडफेक केली जाईल, असा इशाराच महापुरी यांनी दिलाय. आपल्या १००० सहकाऱ्यांसोबत ७ मे रोजी ते काश्मीरसाठी रवाना होणार आहेत.