५५ वधूंसोबत पहिली रात्र घालवल्यानंतर 'तो' गायब

राजस्थान पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये असलेला जमाई राजा नावानं ओळखला जाणारा जियाराम जट याचा ११ जूनला मृत्यू झाला आहे.

Updated: Jun 16, 2016, 07:18 PM IST
५५ वधूंसोबत पहिली रात्र घालवल्यानंतर 'तो' गायब title=

जयपूर : राजस्थान पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये असलेला जमाई राजा नावानं ओळखला जाणारा जियाराम जट याचा ११ जूनला मृत्यू झाला आहे. जियारामनं ५५ मुलींना धोका दिला होता. जियारामनं ५५ वधूंबरोबर पहिली रात्र घालवल्यानंतर जियाराम दागिने घेऊन गायब व्हायचा. 

वयाच्या ५४ व्या वर्षी जियारामचं निधन झालं आहे. जियारामला ३५ वर्षांपासून पोलीस शोधत होते. जियारामच्या पार्थिवाला पोलीस येईपर्यंत कोणीही हात लावला नाही, अखेर पोलिसांनीच त्याचं पोस्टमॉर्टम केलं आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.