बजेट वाचताना अर्थमंत्री जेटली यांची तब्येत बिघडली

 2014-15चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांची अचानक तब्येत बिघडली. यामुळं बजेटचं भाषण काही मिनीटांसाठी थांबवावं लागलं. भाषण करताना अर्थमंत्री जेटली यांची पाठ दुखू लागली होती. मग लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजनांकडून जेटली यांनी पाच मिनीटांच्या ब्रेकची परवानगी मागितली. 

Updated: Jul 10, 2014, 05:54 PM IST
बजेट वाचताना अर्थमंत्री जेटली यांची तब्येत बिघडली  title=
फाईल फोटो

नवी दिल्ली :  2014-15चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांची अचानक तब्येत बिघडली. यामुळं बजेटचं भाषण काही मिनीटांसाठी थांबवावं लागलं. भाषण करताना अर्थमंत्री जेटली यांची पाठ दुखू लागली होती. मग लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजनांकडून जेटली यांनी पाच मिनीटांच्या ब्रेकची परवानगी मागितली. 

लोकसभा अध्यक्षांनी यासाठी ब्रेकची परवानगीही दिली. पाच मिनीटांसाठी संसदेतील काम थांबले होते. तब्येत ठीक नसल्यानं  

विदेशी मंत्री सुषमा स्वराज यांनी जेटली यांना बजेट पेपर सभागृहासमोर ठेवण्यास सांगितलं. मात्र जेटलींनी पूर्ण बजेट वाचण्याचा हट्ट धरला होता. पाच मिनीटानंतर जेटली यांनी पुन्हा भाषण वाचण्यास सुरुवात केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.