केरळमधून इसिसच्या चार दहशतवाद्यांना अटक

भारतात दहशतवादी संघटना इसिसचं जाळं पसरत चालल्याचं पुढे येतंय. कारण, आता केरळमधून इसिसच्या चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. 

Updated: Sep 15, 2015, 05:18 PM IST
केरळमधून इसिसच्या चार दहशतवाद्यांना अटक  title=

तिरुअनंतपुरम : भारतात दहशतवादी संघटना इसिसचं जाळं पसरत चालल्याचं पुढे येतंय. कारण, आता केरळमधून इसिसच्या चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. 

हे चौघे जण संशयास्पदरित्या अबुधाबीवरून तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाले होते. पोलीस या चौघांची कसून चौकशी करत आहेत.

अधिक वाचा - ... म्हणून झाडाला लाल कपडा बांधतात पाकिस्तानी दहशतवादी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या या चौघांपैकी दोन जण करीपूर विमानतळावर उतरले होते तर इतर दोन जण आज सकाळी तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाले होते. राज्याचे गुप्तचर विभागाचे अधिकारी या चौघांनी चौकशी करत आहेत. 

अधिक वाचा - भारतीय मुस्लिमांनी क्रूर 'इसिस'विरुद्ध जारी केला फतवा!

मलप्पुरममध्ये दोनच दिवसांपूर्वी दोन जणांची चौकशी करण्यात आली होती. पण, त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. आज ज्या तरुणांची चौकशी करण्यात आली त्यातील एक जण अगोदर सोडण्यात आलेल्यापैंकी एकाचा नातेवाईक आहे. 

यापूर्वी, 11 सप्टेंबर रोजी इस्लामिक स्टेटसाठी काम करणाऱ्या अफ्शा जबीन ऊर्फ निकी जोसेफ हिला हैदराबादच्या सिकंदराबादमध्ये अटक करण्यात आलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.