ऑनलाईन रेल्वे तिकिट बुकिंग करताना IRCTC साईट होतेय हॅक

अनेक वेळा रेल्वे तिकिट आरक्षण करताना IRCTC साईटवर प्रतिसाद मिळत नाही. मात्र, याचे कारण पुढे आलेय ते म्हणजे IRCTC साईट बुकिंगच्यावेळी हॅक केली जात आहे.

Updated: Jan 2, 2016, 05:10 PM IST
ऑनलाईन रेल्वे तिकिट बुकिंग करताना IRCTC साईट होतेय हॅक   title=

नवी दिल्ली : अनेक वेळा रेल्वे तिकिट आरक्षण करताना IRCTC साईटवर प्रतिसाद मिळत नाही. मात्र, याचे कारण पुढे आलेय ते म्हणजे IRCTC साईट बुकिंगच्यावेळी हॅक केली जात आहे.

अनेक वेळा IRCTC साईट हॅक केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना ऑनलाईन रेल्वे तिकिट बुकिंग करताना समस्या निर्माण होते. नो पेज शो होते. मात्र, जास्त लोकांनी लॉगऑन केल्याचे सांगण्यात येते. मात्र, ते केवळ निमित्त आहे. जास्त लोकांनी साईटला भेट दिली तरी IRCTC साईट क्रश होत नाही. त्यामागे हॅकच असल्याचे पुढे आलेय.

 अनेकवेळा बेकायदा सॉफ्टवेअर विक्री करणाऱ्या साईटची माहिती हाती आली आहे. या साईटने स्पष्ट केलेय. १० ते २० सेकंद पहिले पीएनआर जनरेट केला जातो. ही बाब रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गांर्भीयाने घेतलेय. त्यांनी ऑनलाईन विक्रि करणाऱ्या सॉफ्टवेअरवर अनेक प्रश्न उपस्थित केलेत. त्यांनी म्हटलेय हॅक करण्याचे सॉफ्टवेअर IRCTC साईट करणाऱ्यांच्या मदतीशिवाय करु शकत नाही.

असे सांगितले  जात आहे की, सॉफ्टवेअर दोन तिकिट बुकिंग करु शकते. त्याची महिना किंमत २००० रुपये आहे. चार तिकिटांसाठी सॉफ्टवेअर २४०० रुपये तर सहा तिकिटांसाठीचे सॉफ्टवेअर २८०० रुपये तर १२ तिकिटांसाठीचे ४४०० रुपये आहे.