भारताच्या राजधानीला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

दिल्ली एनसीआरमध्ये आज दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. 

Updated: Jan 2, 2016, 04:34 PM IST
भारताच्या राजधानीला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के title=

नवी दिल्ली : दिल्ली एनसीआरमध्ये आज दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. 

या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानचं 'हिंदुकुश' होतं. हा भूकंपाचा धक्का फारसा तीव्र नसल्यानं अनेकांना हे कंपन जाणवलं नाही. 

यापूर्वी, २६ डिसेंबरच्या रात्रीही दिल्ली, जम्मू काश्मीर आणि उत्तर भारतातील भागांत भूकंपाचा धक्का बसला होता. त्याचाही केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील 'हिंदुकुश' क्षेत्रातच होतं. या भूकंपाची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल होती. 

३१ डिसेंबरलाही मध्य नेपाळमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी १५ डिसेंबरला बिहार-झारखंडमध्येही भूकंपाचे धक्के बसले होते. परंतु, यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती.