रेल्वेची जबरदस्त कॅशबॅक ऑफर

आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टूरिजम कॉरपोरेशननं  प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर दिली आहे.

Updated: May 16, 2016, 05:53 PM IST
रेल्वेची जबरदस्त कॅशबॅक ऑफर title=

मुंबई: आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टूरिजम कॉरपोरेशननं  प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर दिली आहे. या ऑफरनुसार कमीत कमी 300 रुपयाची खाण्याची प्रीपेड ऑर्डर दिल्यावर 50 टक्के पैसे परत मिळणार आहेत. 

ही कॅशबॅक सुविधा मिळवण्यासाठी आयआरसीटीसीची वेबसाईट किंवा फूड ऑन ट्रॅक या मोबाईल अॅपवरून प्रवाशांना बुकिंग करावं लागणार आहे. खाण्याची डिलिव्हरी झाल्यानंतर 50 टक्के पैसे हे प्रवाशाच्या त्या अकाऊंटमध्ये जमा होतील जिथून त्यानं बुकिंग केलं आहे. 

या कॅशबॅक ऑफर विषयी कोणतीही माहिती हवी असल्यास प्रवाशांनी आयआरसीटीसीच्या वेबसाईटला भेट द्यावी किंवा 1323 या टोल फ्री नंबरवर फोन करावा, असं आवाहन रेल्वेनं केलं आहे.