नवी दिल्ली : पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाला नवी दिल्लीमध्ये राजपथावर मोठा कार्यक्रम होतोय.
या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, राजकीय नेते, सेलिब्रेटी हजर राहणार आहेत. देशभरात योगदिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहेच, पण जगातल्या अनेक देशांमध्ये या भारतीय प्राचीन योगविद्येचे धडे उद्या गिरवले जातील.
राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांनाही उद्याचा रविवार योगाचा योग घेऊन आलाय. सर्व शाळांनी हा योग दिन साजरा करावा, असे आदेशच शिक्षणमंत्र्यांनी दिलेत.
'झी 24 तास'ही या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.