www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मागील सहा महिन्यांपासून टोगो इथल्या तुरुंगात बंद असलेले कॅप्टन जेम्स तुरुंगातून सुटलेले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी याबाबत ट्वीट करुन ही महिती दिलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टोगोच्या तुरुंगातून सुटल्यानंतर जेम्स आज रात्रीपर्यंत भारतात परततील.
सुनील यांचा ११ महिन्यांचा मुलगा विवानचा मृत्यू झालाय आणि त्याचा मृतदेह आतासुद्धा मुंबईतल्या रुग्णालयात ठेवलेलं आहे. विवानच्या अंत्यसंस्कारासाठी सुनीलची वाट पाहण्यात येत होती. त्याच्या कुटुंबियांनी मागणी केली होती की सुनीलचं आपल्या मुलाचं अंत्यसंस्कार करेल आणि जेव्हा सुनील परतेल तेव्हाच त्याच्या मुलाचा मृतदेह दफन करण्यात येईल.
सुनील जेम्स यांनी यूकेतील एका शिपिंग कंपनीसोबत चार महिन्यांचा करार केला होता. ऑगस्ट महिन्यात ते परतणार होते. मात्र १६ जुलै २०१३ला टोगो पोलिसांनी समुद्रचाच्यांना शरण दिल्याच्या आरोपावरुन त्यांना अटक केली होती. आज सहा महिन्यांनंतर टोगो पोलिसांनी त्यांना सोडलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.