टीम इंडियाच्या ५ बाद २५५ रन्स , विराटचे शतक

जोहान्सबर्ग टेस्टमध्ये टीम इंडियानं पहिल्या दिवसअखेर ५ विकेट्स गमावून २५५ रन्स केले आहेत कॅप्टन महेंद्रसिंग धोनी १७ रन्सवर आणि मुंबईकर अजिंक्य रहाणे ४३रन्सवर नॉटआऊट आहेत. दरम्यान, भारतानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 18, 2013, 11:14 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, जोहान्सबर्ग
जोहान्सबर्ग टेस्टमध्ये टीम इंडियानं पहिल्या दिवसअखेर ५ विकेट्स गमावून २५५ रन्स केले आहेत कॅप्टन महेंद्रसिंग धोनी १७ रन्सवर आणि मुंबईकर अजिंक्य रहाणे ४३रन्सवर नॉटआऊट आहेत. दरम्यान, भारतानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला.
जोहान्सबर्ग येथील दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा युवा फलंदाज विराट कोहलीने शानदार शतक झळकाविले. त्याने ११९ रन्स केल्यात. पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाची सुरुवात अतिशय खराब झाली. टीम इंडियाचे दोन्ही ओपनर्स पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. शिखर धवन १३ रन्सवर तर मुरली विजय ६ रन्स काढून आऊट झाला. ओपनर्स झटपट आऊट झाल्य़ानंतर कोहली आणि पुजारानं टीम इंडियाची इनिंग सावरली आहे.
दरम्यान, वन-डेप्रमाणेच टेस्टमध्येही भारताच्या बॅट्समनना फारशी कमाल करता आली नाही. आफ्रिकन टीमच्या तेज मा-यासमोर भारतीय बॅट्समन हतबल झालेले दिसले. डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्केल ही आफ्रिकन पेस बॅट्री वन-डे प्रमाणेच टेस्टमध्येही भारतीय टीमसाठी चांगलीच डोकेदुखी ठरतेय.
ओपनर्स अवघ्या २४ रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर मिडल ऑर्डरवर मोठा दबाव आला होता. विराट कोहली टीम इंडियाच्या मदतीला धावून आला. त्यानं टेस्टमधील ५ वी सेंच्युरी झळकावत आफ्रिकन पेस बॅट्रीचा यशस्वी सामना केला. त्यानं ११९ रन्सची झुंजार इनिंग खेळली. पुजाराबरोब त्यानं तिस-या विकेटसाठी ८९ रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशिपही केली. आता टेस्टच्या दुस-या दिवशी भारतीय टीम मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्नशील असेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.