भारतीय रेल्वेही फेसबुकवर

संपूर्ण भारतात भारतीय रेल्वेचं जाळं पसरलं आहे. तसंच इंटरनेटचं जाळंही पसरू लागलं आहे. इंटरनेटवर फेसबुक पाहाणाऱ्या भारतीयांचं प्रमाण सर्वाधिक आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 11, 2013, 04:41 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
संपूर्ण भारतात भारतीय रेल्वेचं जाळं पसरलं आहे. तसंच इंटरनेटचं जाळंही पसरू लागलं आहे. इंटरनेटवर फेसबुक पाहाणाऱ्या भारतीयांचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळेच भारतीय भारतीय रेल्वेनेही आता फेसबुकवर येण्याचा निर्णय घेतला आहे.
यापुढे भारतीय रेल्वेचेही फेसबुकवर प्रोफाईल्स दिसतील. मात्र ही प्रोफाइल्स तक्रारी करण्यासाठी नसून रेल्वेच्या त्या त्या झोनमधील गोष्टींची माहिती देण्यासाठी आहेत. फेसबुकची वाढती लोकप्रियता पाहून रेल्वे बोर्डचे चेयरमन विनय मित्तल यांनी सर्व रेल्वे झोन्सला फेसबुक प्रोफाइल उघडण्याचे आदेश दिले आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या पेजवर सुंदर रेल्वे स्टेशनच्या फोटोंसहीत तेथील फाटक पार करताना दिल्या जाणाऱ्या सूचनाही फेसबुकवर लिहिलेल्या आढळतील. नव्या ट्रेन्सच्या घोषणा येथे पाहायला मिळतील. स्पेशल कोच आणि इतर लहान-मोठ्या व्यवस्थांचीही येथे माहिती उपलब्ध होईल.