नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पुण्यात राहणारा आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या संशयित सदस्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले.
उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून इजाज शेख या संशयित दहशतवाद्यास दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. त्याला दिल्लीला आणण्यात आले असून त्याची चौकशी सुरु आहे.
इजाज हा पुण्यातील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. इजाज हा इंडियन मुजाहिदीनसाठी टेक्निकल एक्स्पर्ट म्हणून कार्यरत होता. तसेच तो दिल्लीतल जामा मशिद परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.