स्विस बँकेतून भारतीय काढतायेत काळा पैसा!

Updated: Sep 1, 2014, 07:07 PM IST
स्विस बँकेतून भारतीय काढतायेत काळा पैसा! title=

नवी दिल्लीः भारतानं काळ्या पैशाच्या विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळं स्विस बॅंकेत ज्या भारतीय लोकांचे खाते आहेत, त्या ग्राहकांनी गेल्या सहा वर्षात 25 लाख कोटी रुपये म्हणजेच (350 अब्ज स्विस फ्रॅंक) काढून घेतले आहेत. 

या प्रकरणात स्विस बॅंकेतून किती भारतीयांनी आपली रक्कम काढून घेतली आहे. याची माहिती मात्र दडवली आहे. यामध्य़े 100 अब्ज स्विस फ्रॅंक रक्कम करचुकवल्यामुळं संबधित देशांना देण्यात आलेला दंड आहे. ग्लोबल कन्स्ल्टन्सी युनिटनं आणि प्राइस वॉटर हाउस कूपरच्या अहवालात नमूद केलेल्या कंपनीनं स्वित्झर्लंडमध्ये नव्वदपेक्षा आधिक बॅंकांच्या केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
स्विस नॅशनल बॅंकनं दिलेल्या माहितीनुसार 2013 वर्षापासून ग्राहकांनी 1.32 ट्रिलियन स्विस फ्रॅंक म्हणजे 90 लाख कोटी रुपये काढले आहेत. यावरुन स्विस बॅंकेचे जागतिक ग्राहक गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी ठेवलेली रक्कम काढण्याचा नवीन ट्रेंड निर्माण झाला आहे. 

2006 मध्ये स्विस बॅंकेत भारतीय ग्राहकांनी ठेवलेल्या रक्कम ही 6.5 अब्ज स्विस फ्रॅंक होती. सध्याचा माहितीनुसार गेल्या चार वर्षांमध्ये या रकमेत घट होउन ही रक्कम 4 अब्ज स्विस फ्रॅंक एवढी आहे. तसंच स्विस बॅंकेतल्या एकूण खातेदारांपैकी बहुसंख्य खातेदार हे भारतीय आहेत. यामध्ये आपले पैसे परत काढणाऱ्या ग्राहकांमध्ये भारतीय ग्राहकांचं प्रमाण कमी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय ग्राहकांनी 14,000 कोटी रुपये स्विस बॅंकेत भरलेत.    

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.