खासदार गायकवाडांचं वर्तन सभ्य होतं, एअर हॉस्टेसचा दावा

एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करताना शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारहाण केली.

Updated: Mar 26, 2017, 08:22 PM IST
खासदार गायकवाडांचं वर्तन सभ्य होतं, एअर हॉस्टेसचा दावा  title=

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करताना शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारहाण केली. या प्रकरणानंतर विमानाच्या एअर हॉस्टेसनं नवा दावा केला आहे. विमान प्रवासादरम्यान गायकवाड यांचं वर्तन सभ्य होतं. रवींद्र गायकवाड अचानक हिंसक होतील असं वाटलं नव्हतं, असं ही एअर हॉस्टेस म्हणाली आहे.

विमानातल्या कर्मचाऱ्याला गायकवाड यांना शिडीवरून खाली फेकायचं नव्हतं ते फक्त दबाव टाकत होते, असं मला वाटत होतं, असा दावाही या एअर हॉस्टेसनं केला आहे. एअर इंडिया कर्मचारी आणि गायकवाड यांच्यामध्ये संभाषण सुरु होतं आणि अचानक वादाला सुरुवात झाली असं एअर हॉस्टेसचं म्हणणं आहे.