भारतीय सैन्यानं चिनी ड्रॅगनची शेपूट ठेचली!

अरूणचाल प्रदेशमध्ये तवांग इथं भारतीय हद्दीमध्ये घुसून एक जुनी भिंत पाडण्याचा चीनी सैनिकांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडलाय. 

Updated: Aug 26, 2014, 09:21 AM IST
भारतीय सैन्यानं चिनी ड्रॅगनची शेपूट ठेचली! title=

तवांग, अरुणाचल प्रदेश: अरूणचाल प्रदेशमध्ये तवांग इथं भारतीय हद्दीमध्ये घुसून एक जुनी भिंत पाडण्याचा चीनी सैनिकांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडलाय. 

झी मीडियाला त्याची दृश्य सूत्रांकडून मिळाली आहेत. त्यांच्या सत्यतेची ग्वाही देता येत नसली तरी यातून चीनची मग्रुरी समोर आली आहे. तवांगवर चीन दावा सांगत आलाय... त्यामुळं तिथं आपले जवान नेहमीच सावध असतात. अशीच एक गस्त घालत असताना भारतीय सैनिकांना भिंत तोडत असलेले हे चिनचे सैनिक दिसले...

आपल्या जवानांनी हटकल्यानंतर त्यांची घाबरगुंडी उडाली. चीनी ड्रॅगनच्या दादागिरीला आपल्या जाँबाज सैनिकांनी दणका दिला आणि मग हे चिनी सैनिक चर्चेच्या मागे लागले. चीनची मुजोरी भारतीय सैनिकांनी मोडून काढली आणि घुसखोर सैनिकांना तिथून निमूटपणे काढता पाय घ्यावा लागला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.