मुंबई : आशिया खंडातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असूनही भारत हा रिटायरमेंटसाठी सगळ्यात वाईट देश आहे. ग्लोबल रिटायरमेटं सूचांकनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
या यादीमध्ये स्विझर्लंड पहिल्या, नॉर्वे दुसऱ्या आणि आईसलँड तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका या यादीत चौदाव्या स्थानावर आहे. रिटायरमेंटनंतर व्यक्तीची आवश्यकता आणि अपेक्षांचा अभ्यास करून हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.
मागच्या वर्षी झालेल्या 150 देशांच्या सर्वेक्षणामध्ये भारत या यादीत 88 व्या क्रमांकावर होता. यावर्षी भारत शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला आहे.