'सेल्फी'च्या फॅडापायी सर्वात जास्त मृत्यू भारतात!

मुंबई : सेल्फी काढताना गेल्याच आठवड्यात दोन मुलींचा वांद्र्यात बँडस्टँडला मृत्यू झाला होता.

Updated: Jan 16, 2016, 01:59 PM IST
'सेल्फी'च्या फॅडापायी सर्वात जास्त मृत्यू भारतात! title=

मुंबई : सेल्फी काढताना गेल्याच आठवड्यात दोन मुलींचा वांद्र्यात बँडस्टँडला मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईत काही जागा 'नो सेल्फी झोन' म्हणूनही घोषित करण्यात आल्या होत्या. आता याच सेल्फीबाबात एक नवी माहिती समोर आलीय. 

सेल्फी काढताना अपघात होऊन सर्वात जास्त मृत्यूची नोंद भारतात झाल्याचं नुकतंच समोर आलंय. अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने यासंबंधी खुलासा केला आहे.



 

जगात २०१५ मध्ये एकूण २७ मृत्यू हे सेल्फीच्या फॅडापायी झालेत. यातील अर्धे मृत्यू एकट्या भारतात झाल्याची माहिती मिळतेय. 

मथुरेजवळ गेल्या वर्षी तिघांचा ट्रेनच्या रुळांवर फोटो घेताना रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला होता. ताज महालात एका जपानी पर्यटकाचाही सेल्फी काढताना मृत्यू झाला होता. त्यामुळे सेल्फीचं हे व्यसन अजून किती जणांचा जीव घेणार? असा प्रश्न उत्पन्न होतोय.